Pages

Friday, September 22, 2017

योगा गीत


                             योगा गीत




   

Sunday, September 17, 2017

प्रोजेक्टर उदघाटन समारंभ


डिजिटल शाळा

आज अखेर आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,द्याने मुले  हि शाळा 
डिजिटल शाळा झाली.मालेगाव तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल होत असताना आमची एवढी मोठी शाळा डिजिटल झाली नव्हती म्हणून आम्हा सर्व शिक्षकांना काही बरे वाटत नव्हते .
                           शेवटी उशिरा का होईना मात्रा सर्व्यांपेक्षा काहीतरी असामान्य असे काहीतरी करायचे होते.
त्यादिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले. औरंगाबादहून एक प्रोजेक्टर आणले.


                                          ⧪⧪⧪⧪⧪Android Projector ⧪⧪⧪⧪⧪                                     
आम्ही त्या प्रोजेक्टर वरून विद्यार्थ्यांना नवनवीन अद्यावत ज्ञान देऊ शकतो. 
प्रत्येकाकडे काहीतरी नवीन माहिती असते तो ती माहिती ह्या प्रोजेक्टर द्वारे दाखवू शकतो.
                              
                            जेव्हा प्रोजेक्टर शाळेत आणले सर्व मुलांनी एकच गर्दी केली.कारण फक्त प्रोजेक्टर नाव ऐकले होते. त्यांना प्रोजेक्टर बघायचे होते. सर्व मुले आपापल्या वर्गशिक्षकांना सांगत होती कि फक्त पडदा तरी दाखवा .शेवटी फिटिंग करायचे कम बंद करून सर्व मुलांना प्रोजेक्टरची स्क्रीन दाखवली .फार  आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर !

  ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪   प्रोजेक्टरचे उद्घाटन ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪     

       प्रोजेक्टरचे उद्घाटन  करण्यासाठी आम्ही   आपल्या तालुक्याच्या शिक्षण सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी madam,उपसभापती मा. तेजासाहेब , गटशिक्षणाधिकारी मा.पारधी madam ,केंद्राच्या केंद्रप्रमुख मा.शारदा पवार  madam ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंदजी गरुड, गावातील शिक्षण प्रेमी  नागरिक, समिती सदस्य यांना आमंत्रित केले होते. ह्या मान्यवरांच्या हस्ते प्रोजेक्टरचे उदघाटन करण्यात आले.
                  उद्घाटन  झाल्यानंतर एकेक वर्गाला फुटबाल दिनाचा बनवलेला विडीओ त्यावर दाखवला.
 ते बघत असताना त्यांचा चेहरा खरच ईतका आनंदित होता कि शब्दात व्यक्त करण जरा मुश्कीलच .

           मात्र एवढे नक्की प्रोजेक्टरमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ होईलच 
 ,अशी अपेक्षा व्यक्त करते.   
              ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭                   

Friday, September 15, 2017

मिशन फुटबॉल डे


                           मिशन फुटबॉल डे
       आज दयाने मुले शाळेत  फुटबॉल डे साजरा झाला .
प्रत्येक मुलाने आपापल्या परीने फुटबॉल खेळले .न बोलणारा मुलगा देखील क्रिडांगणावर ओरडत होता , टिमला चिअर अप करत होता . एक गोल झाल्यावर चेहऱ्यावर आनंद होता जणू एक गड जिंकल्याचा.
 मोठया मुलांना खेळतांना पाहून लहान वर्गातील मुले उत्साही झाले व विचारू लागले , " आम्हांलाही खेळायला मिळेल का ? " हसायलाही येत होतं . मनात प्रश्न  येत होता की , ह्या लहान मुलांना खेळता येईल का ?पण शेवटी त्यांचा नंवर लावला कारण इतरांचा खेळ 
बघून काहीतरी नक्कीच शिकतिल .
मात्र ह्याच लहान मुलांनीच खरा आनंद घेतला कुणी अम्पायर नाही , कुणी रागावणारा नाही , कुणी आऊट म्हणणारा नाही फक्त किक मारा आणि बॉलला हलवा . कुणी किक मारतांना बघितले की कुणी बॉल हातात घेऊन पळायचे , बॉलला किक मारू देत नसे , पण समजावल्यानंतर पुन्हा खेळ सुरू . खर पाहता ह्याच लहान मुलांचा आनंद महत्वाचा.
 निर्मळ आणि निरागसता प्रत्यक्षदर्शी दिसत होती . ह्या मुलांना पाहून   आम्हांला चेतना मिळाली, प्रेरणा मिळाली
" प्रत्येक क्षणाचा आनंद मनसोक्त घ्या . "