https://technoeducation.in/mazi-shala-sundar-shala-result-declare-2/
Prerna blogspot.com.in
EDUCATIONAL BLOG
Pages
- ब्लॉग विषयी कार्यशाळा
- माझ्या ब्लॉग विषयी काही .....
- जागतिक आरोग्य दिन
- स्वातंत्र्यदिनाचे फोटो
- माझे सहकारी शिक्षक
- ज्ञानरचनावाद आरेखन
- आमचे उपक्रम
- योगासने
- पहिली -दुसरी ज्ञानरचनावादी उपक्रम
- पहिली पाठयक्रम लिंक
- गणितपेटी
- महात्मा गांधी भाषण
- ९ ऑगस्ट क्रांती दिन भाषण
- स्वातंत्र्यदिन भाषण मराठी , इंग्रजी
- फलकलेखनांचे नमुने
- छत्रपती शिवाजी महाराज माहिती
- शिक्षकाची भुमिका व कामे
- वकतृत्व शैलीचा वापर
- मोबाईल नंबर आधारकार्डला लिंक करा
- मराठी माध्यमाचा हट्ट का ?
- सूत्रसंचालन चारोळ्या
- स्वागत गीत mp3
- समुहगीत
- गुणवत्ता गीत mp3
- स्वच्छता शपथ
- गुरूचे महत्व
- ऐतिहासिक सणावळ्या
- जवाहरलाल नेहरु बालदिन
- महत्त्वाचे दिन विशेष
Sunday, October 13, 2024
Thursday, October 12, 2017
वाचन प्रेरणा दिन
ए. पी.जे अब्दुल कलाम
वाचन प्रेरणा दिन
अग्नीबाणाचा शोधक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म-इ. स. १९३१
रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. रामेश्वरम ते धनुष्कोडी असा प्रवास करणाऱ्यांचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय. सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मृर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मणशास्त्री हे त्यांचे घनिष्ट मित्र. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामचे बालपण गेले.
सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी एरोडायनॉमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली. ”तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणी उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले.
त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हॉवरक्रफ्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हॉ वरक्रफ्टचा तयार केली. ‘नंदी’ हे त्यांचे नाव. पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हॉवरक्रफ्ट तयार करण्याची संधी मात्र मिळाली नाही. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला.
अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरु केले. रोहिणी या उपग्रहाणे सुरु झालेल्या हा प्रयत्न पृथ्वी,अग्नी, आकाश, नाग अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला. त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे.
डॉ. साराभाई, प्रा. मेनन,डॉ. राजा रामण्णा,डॉ. धवन, डॉ. ब्रम्ह प्रकाश यांचे कर्तुत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापुर्वक उल्लेख केला आहे. ”मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल” एका सभेत ते उद्गारले. त्यावेळी ते इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला.
पूर्ण नाव अमीर पाकीर ज़ैनुलाबदिन अब्दुल कलाम
जन्म १५ ऑक्टोबर, १९३१
रामेश्वर
मृत्यू २७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म इस्लाम
कार्यसंस्था संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्याती शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कार पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न
वडील जैनुलाबदिन अब्दुल
शिक्षण संपादन करा
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.
कार्य संपादन करा
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत
होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..
Friday, September 22, 2017
Sunday, September 17, 2017
प्रोजेक्टर उदघाटन समारंभ
डिजिटल शाळा
आज अखेर आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,द्याने मुले हि शाळा
डिजिटल शाळा झाली.मालेगाव तालुक्यातील सर्वच शाळा डिजिटल होत असताना आमची एवढी मोठी शाळा डिजिटल झाली नव्हती म्हणून आम्हा सर्व शिक्षकांना काही बरे वाटत नव्हते .शेवटी उशिरा का होईना मात्रा सर्व्यांपेक्षा काहीतरी असामान्य असे काहीतरी करायचे होते.
त्यादिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले. औरंगाबादहून एक प्रोजेक्टर आणले.
⧪⧪⧪⧪⧪Android Projector ⧪⧪⧪⧪⧪
आम्ही त्या प्रोजेक्टर वरून विद्यार्थ्यांना नवनवीन अद्यावत ज्ञान देऊ शकतो.
प्रत्येकाकडे काहीतरी नवीन माहिती असते तो ती माहिती ह्या प्रोजेक्टर द्वारे दाखवू शकतो.
जेव्हा प्रोजेक्टर शाळेत आणले सर्व मुलांनी एकच गर्दी केली.कारण फक्त प्रोजेक्टर नाव ऐकले होते. त्यांना प्रोजेक्टर बघायचे होते. सर्व मुले आपापल्या वर्गशिक्षकांना सांगत होती कि फक्त पडदा तरी दाखवा .शेवटी फिटिंग करायचे कम बंद करून सर्व मुलांना प्रोजेक्टरची स्क्रीन दाखवली .फार आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर !
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪ प्रोजेक्टरचे उद्घाटन ⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
प्रोजेक्टरचे उद्घाटन करण्यासाठी आम्ही आपल्या तालुक्याच्या शिक्षण सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी madam,उपसभापती मा. तेजासाहेब , गटशिक्षणाधिकारी मा.पारधी madam ,केंद्राच्या केंद्रप्रमुख मा.शारदा पवार madam ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंदजी गरुड, गावातील शिक्षण प्रेमी नागरिक, समिती सदस्य यांना आमंत्रित केले होते. ह्या मान्यवरांच्या हस्ते प्रोजेक्टरचे उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन झाल्यानंतर एकेक वर्गाला फुटबाल दिनाचा बनवलेला विडीओ त्यावर दाखवला.
ते बघत असताना त्यांचा चेहरा खरच ईतका आनंदित होता कि शब्दात व्यक्त करण जरा मुश्कीलच .
मात्र एवढे नक्की प्रोजेक्टरमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ होईलच
,अशी अपेक्षा व्यक्त करते.
⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭
Friday, September 15, 2017
मिशन फुटबॉल डे
मिशन फुटबॉल डे
आज दयाने मुले शाळेत फुटबॉल डे साजरा झाला .
प्रत्येक मुलाने आपापल्या परीने फुटबॉल खेळले .न बोलणारा मुलगा देखील क्रिडांगणावर ओरडत होता , टिमला चिअर अप करत होता . एक गोल झाल्यावर चेहऱ्यावर आनंद होता जणू एक गड जिंकल्याचा.
मोठया मुलांना खेळतांना पाहून लहान वर्गातील मुले उत्साही झाले व विचारू लागले , " आम्हांलाही खेळायला मिळेल का ? " हसायलाही येत होतं . मनात प्रश्न येत होता की , ह्या लहान मुलांना खेळता येईल का ?पण शेवटी त्यांचा नंवर लावला कारण इतरांचा खेळ
बघून काहीतरी नक्कीच शिकतिल .
मात्र ह्याच लहान मुलांनीच खरा आनंद घेतला कुणी अम्पायर नाही , कुणी रागावणारा नाही , कुणी आऊट म्हणणारा नाही फक्त किक मारा आणि बॉलला हलवा . कुणी किक मारतांना बघितले की कुणी बॉल हातात घेऊन पळायचे , बॉलला किक मारू देत नसे , पण समजावल्यानंतर पुन्हा खेळ सुरू . खर पाहता ह्याच लहान मुलांचा आनंद महत्वाचा.
निर्मळ आणि निरागसता प्रत्यक्षदर्शी दिसत होती . ह्या मुलांना पाहून आम्हांला चेतना मिळाली, प्रेरणा मिळाली
" प्रत्येक क्षणाचा आनंद मनसोक्त घ्या . "
Sunday, August 20, 2017
सर्जनशीलतेला वाव
मूर्ती घडविणे कार्यशाळा
आज आमच्या शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला तो म्हणजे मूर्ती घडविणे .
त्यासाठी सर्व मुले शाडूची माती घेऊन आले होते त्या मुलांना गटागटांत व सक्ष एकेक शिक्षक मदतीसाठी दिला .एवढया मुलांना आमच्या शाळेचे कार्यानुभव शिक्षक श्रीनिरभुवने सरांनी मार्गदर्शन केले .
Friday, August 18, 2017
आमचे प्रेरक
आमचे प्रेरक

.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
मा श्री नरेंद्र मोदी
माश्री . सुभाष जी भामरे
मा. श्री. देवेंद्र फडणवीस
मा. श्री.विनोदजी तावडे
मा.पंकजाताई मुंडे
मा श्री. दादाभाऊ भुसे
.

मा सौ . शितलताई सांगळे
मा सौ प्रतिभाताई सूर्यवंशी
मा श्री. अनिल तेजा
मा. यतिन पगार
मा श्री. आनंदराव पिंगळे
![]() |
मा अरूण पाटील
मा. श्री . शंकरराव बोरसे
मा श्री.डी.एस. गायकवाड
मा.सौ. शारदा पवार
Subscribe to:
Posts (Atom)